बीड -(सखाराम पोहीकर)एस टी बस व मोटारसायकलच्या आपघातात एक जण मयत तर दुसरा जखमी ईसम जख्मी झाला होता. मात्र या अपघातात एस टी चालका ऐवजी मोटारसायकल चालकावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी अपघातात मयत झालेल्या तरूणाचा मृतदेह जामखेड- खर्डा रोडवर आणुन ठेवत रास्तारोको आंदोलन केले . यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी कळंब- पुणे बस वर दगडफेक केली अखेर संबधीत एस टी चालकावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतरच सदरचे रस्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.याबाबत समजलेली माहीती अशी की, अहमदनगर जिल्हयातील खर्डा शहराजवळ सिताराम गडाच्या पायथ्याशी जामखेड-खर्डा रस्तयावर मुंबई कळंब एस टी बस व मोटारसायकल यांच्यामध्ये अपघात झाला होता. या अपघातात सोनु अनिल काळे रा.खर्डा वय २५ वर्षे याचा जागीच मर्त्यु झाला तर दुसरा मोटारसायकल चालवणारा चालक संदीप लहु पवार रा. खर्डा हा जखमी झाला होता. घटनेनंतर खर्डा पोलिसांनी एसटी चालकावर गुन्हा दाखल करण्या ऐवजी उलट बस चालकाच्या फिर्यादीवरून मोटारसायकल अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीवरच गुन्हा दाखल केला होता.यानंतर मयत झालेल्या व्यक्तीवर जामखेड ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला.जखमीवर गुन्हा दाखल झाला याबाबतची माहीती संबधीत नातेवाईकांना समजल्या नंतर ते खर्डा पोलीस स्टेशनला गेले व तुम्ही एसटी चालकावर गुन्हा दाखल करण्या ऐवजी मोटारसायकलवर जखमी झालेल्या व्यक्तीवरच गुन्हा दाखल का केला ?असा जाब विचारला यानंतर पोलिंसाकडुन गुन्हा दाखल करण्यात आलेल्या नातेवाईकानांच आरेरावीची भाषा वापरली गेली असल्याची माहीती नातेवाईकांनी दिली.या नंतर संतप्त झालेल्या खर्डा येथिल मयत व जखमी याच्या नातेवाईकांनी मृत्युदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला . तसेच जखमी व्यक्तीवरील गुन्हा मागे घेऊन एसटी बस चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत सदरचा मृतदेह रस्तयावर ठेऊन जामखेड-खर्डा रस्तयावरच ठीय्या व रस्तारोको आंदोलन केले. यावेळी संतप्त नातेवाईकांनी कळंब पुणे बसवर दगडफेक करून गाडीच्या काचा फोडल्या. तसेच जो पंर्यत अपघातास कारणीभुत ठरलेल्या एसटी बस चालकाविरूध्द गुन्हा दाखल होत नाही तोपंर्यत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेतला.अखेर एसटी बस चालकावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर रस्तयावर सुरू असलेले ठीय्या आंदोलन तब्बल एक तासानंतर मागे घेत नातेवाईकांनी रात्री उशीरा मयतावर अंत्यसंस्कार केले .