कारंजा लाड (अशोकराव उपाध्ये)
काजळेश्वर येथील रहिवासी माजी सैनिक मानोरा पोलीस स्टेशनला कार्यरत पोलीस कर्मचारी सुनील अजाबराव गणेशपूरे कर्तव्यात असतांना मानोरा घाटात दापूऱ्याजवळ सरत्या वर्षाच्या संध्याकाळी मोटार सायकल अपघातात दि. ३१ डिसेंबर रोजी त्यांचे दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी समयी त्यांचे वय अंदाजे ४८ वर्ष पर्यत्न असेल . त्यांचे मागे पत्नी; दोन मुले ;एक मुलगी; आई; दोन भाऊ असा आप्त परीवार आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूची खबर पोहचताच
गणेशपूरे परीवार; त्यांचा मीत्र परीवार; नातेवाईक व गावकरी तथा पोलीस दल व माजी सैनिक संघटणा यांचेवर शोककळा पसरली.
वृत्त असे की सुनील अजाबराव गणेशपूरे हे भारतीय सैन्यदलात २० वर्षापूर्वी भरती झाले. त्यांनी देशसेवा
स्वाभीमानीपणे केली. सतरा वर्ष सेवेनंतर ते वाशिम पोलीस म्हणून कर्तव्यावर रुजू झाले. सद्या ते मानोरा पोलीस स्टेशनला कार्यरत होते. कर्तव्यावर असतांना काळाने सरत्या वर्षांत त्यांचे वर घाला घातला. ३१ डिसेंबर २३ची संध्याकाळ त्यांच्यासाठी वाईट ठरली. मोटारसायकल अपघातात त्यांचे अपघाती निधन झाले.
गावात परीवारावर शोककळा पसरली. याच वर्षी ग्रामपंचायत व गामस्थाकडून त्यांचा भारतीय सैन्य दलाचे माजी सैनीक म्हणून भावपूर्ण सत्कार झाला होता त्यासत्कारात ते भाराऊन गेले होते. सामान्य परीस्थीतीतून आपल्या धाडसी स्वभावाने आज ते सुखी व आनंदी जीवन जगत होते.
मोक्षधाम काजळेश्वर येथे त्यांचा १ जानेवारी रोजी दुपारी शोकाकूल वातावरणात अन्त्यसंस्कार पार पडला. पोलीस उपविभागीय अधिकारी पांडे साहेब; कारंजा ग्रामीण ये ठाणेदार सुनील वानखडे; मानोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार व पोलीस कर्मचारी; माजी सैनीक संघटना यांनी त्यांना शासकीय इतमात मानवंदना दिली. यावेळी बिगूल सह पोलीस दलाने बंदूकीच्या फैरी झाडून शासकीय सन्मान त्यांना देण्यात आला.
पोलीस उपविभागीय अधिकारी पांडे साहेब; कारंजा ग्रामीण ठाणेदार सुनील वानखडे; मानोरा ठाणेदार; पोलिस दल; माजी सैनीक संघटणा; तसेच राष्ट्रवादीचे नेते दत्तराज डहाके यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी गावकऱ्यांच्या मोठया प्रमानात उपस्थीतीत होती.