चोपडा (हेमकांत गायकवाड )
पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित पंकज इंग्लिश मीडियम स्कूल येथे दरवर्षीप्रमाणे विविध सण उत्सव जयंती साजरे करण्यात येतात त्याचबरोबर 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती असल्यामुळे बालिका दिवस ही साजरा करण्यात आला.यात विद्यार्थिनींनी सावित्रीबाईच्या वेशामध्ये येऊन भाषणे दिली.तसेच शाळेतील महिला शिक्षिका यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.शाळेतील मुख्याध्यापक केतन माळी सर यांनी सावित्रीबाईं विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनीही सावित्रीबाईन विषयी भाषणे दिली.पंकज इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच शाळेतील सर्व कर्मचारी यांचीही मदत लाभली.
